‘केक’चा हॅपी बर्थ डे !

November 1, 2014 4:07 PM0 commentsViews:

01 नोव्हेंबर : वाढदिवसाला केक कापण्याची पद्धत तर सर्वज्ञात आहे..पण कोचिनमध्ये केकचा वाढदिवस साजरा केला गेलाय. सर्वात मोठा केक बनवून हा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात येतोय. कोचीन बेकर्सनं हा केक बनवलाय. तब्बल 600 फूट लांब आणि एक फूट रूंदीचा हा एगलेस केक 3 हजार 120 किलोचा आहे. या केकची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झालीय. जॅम, वनस्पती, रेडी मिक्स पावडरचा या फ्लेवर्सचा हा केक 26 बेकर्सनं एकत्र येऊन सलग तीन दिवस मेहनत घेऊन बनवलाय. अनेक राजकीय आणि सामाजिक कार्य करणार्‍या नेत्यांचे फोटा या केकवर आहेत. भारतात 131 वर्षांपूर्वी मंबल्ली बप्पू यांनी पहिला केक बनवला होता. त्यांनाच श्रद्धांजली आणि भारतातील केकचा बर्थ डे साजरा करण्यासाठी हा केक बनवला होता. या केकचे स्लाईस करून 2014 च्या बेक-एक्स्पोमध्ये त्याचं वाटप करण्यात येणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close