नाशिकमधल्या वाढत्या गुन्हेगारीविरोधात मनसेचं आंदोलन

June 13, 2009 10:55 AM0 commentsViews: 9

13 जून नाशिकमधल्या वाढत्या गुन्हेगारीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. गुन्हेगारांना संरक्षण देणार्‍या सत्ताधार्‍यांचा मनसेने त्यांच्या मूक मोर्चातून निषेध केला. त्यावेळी मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुहास कांदे यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचं पक्षाने प्रथमच जाहीरपणे मान्य केलं आहे. तसंच यावेळी गुन्हेगाराला पाठीशी घालणार नसल्याची भूमिका मनसेने मांडली. मात्र तडीपारीची नोटीस मिळाली नसल्याचा पवित्रा मनसेने यावेळी घेतला.

close