नाशिकमधील गुंडगिरी : 4 नेत्यांना हद्दपारीची नोटीस

June 13, 2009 11:05 AM0 commentsViews: 4

13 जून गुंडगिरीविरोधात नाशिककरांची जोरदार मागणी आणि 'आयबीएन-लोकमत'ने केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. नाशिकमधल्या चार राजकीय नेत्यांविरुध्द पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. यात राष्ट्रवादीचे कैलास मुदलियार, मनसेचे सुहास कांदे तर रिपाईचे अर्जुन पगारे, भूषण लोंढे यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. यापैकी कैलास मुदलियार उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे शहर उपाध्यक्ष आहेत. तर सुहास कांदे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. एकूण 25जणांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

close