भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी दिला सर्व पदांचा राजीनामा

June 13, 2009 11:19 AM0 commentsViews: 6

13 जून भाजपचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी भाजप पक्षसदस्याचा तसंच पक्षाच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. यशवंत सिन्हा यांनी त्यांचा राजीनामा भाजपला पत्राने कळवला होता. पण भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी त्याचा इन्कार केला आहे. यशवंत सिन्हा यांनी वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं होतं. 1996 साली ते भाजपमध्ये दाखल झाले होते. भाजपमध्ये येण्यापूर्वी यशवंत सिन्हा हे जनता दलात होते. 1991 साली चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय अर्थमंत्री होते.

close