आता मंत्रिमंडळाची बैठक बुधवारऐवजी मंगळवारी

November 1, 2014 7:27 PM0 commentsViews:

fadanvis01 नोव्हेंबर : वानखेडे स्टेडियमवर ‘महा’राज्याभिषेकानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीम कामाला लागली आहेत. राज्यात पहिल्यांदाच सत्ता आल्यामुळे भाजप सरकार काय निर्णय घेतेय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आघाडी सरकारने दर बुधवारी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेत होती आता हा पायंडा बंद करण्यात आला आहे. आता दर मंगळवारीही बैठक होणार आहे.

आज राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मंत्रिमंडळानं राज्याच्या आर्थिक, कृषी, गृह, ऊर्जा विभागाच्या सध्याच्या स्थितीचा मॅरेथॉन आढावा घेतला. प्रत्येक विभागाच्या सचिवांनी विस्तृत सादरीकरण केलं.. मंत्रिमंडळाकडून आज कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण प्रत्येक विभागाच्या सचिवांचे विस्तृत सादरीकरण करण्यात आलंय. राज्यावर कर्जाचा डोंगर असला तरी सुधारणा करण्यासाठी आजची स्थिती तपासणे, शेती- पाऊस पाणी,पिकांची स्थिती, शेतकरी कर्जे,कृषीपुरवठा कर्ज,शेतकर्‍यांचे अनुदान वाटप गृह- कायदा व सुव्यवस्था, महिला अत्याचार,गुन्हे प्रमाण याचा आढावा घेण्यात आला. या खात्यांमधले प्रलंबित प्रकल्प आणि इतर धोरणांविषयीही यावेळी चर्चा झाली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close