पाथर्डी हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात

November 1, 2014 9:57 PM0 commentsViews:

pathardi dalit murder case01 नोव्हेंबर : पाथर्डी तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणाला 11 दिवस उलटल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारने दखल घेतलीये. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे उपमहासंचालकांना आदेश देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच जवखेड हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल, अशी घोषणाही कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सरकारतर्फे पंकजा मुंडे उद्या जवखेडेला भेट देणार आहे.

अहमनगर जिल्हा पुन्हा एकदा दलित हत्याकांडाने प्रकाशझोतात आला. 20 ऑक्टोबर रोजी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे इथं संजय जाधव, जयश्री जाधव आणि सुनील जाधव या तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तिघांच्या मृतदेहाचे तुकडे करून शेतातील विहीर आणि बोअरिंगमध्ये फेकून देण्यात आली होती. तब्बल तीन दिवस मृतदेहांच्या अवयवांचा शोध सुरू होता. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यासंस्कार करण्यात आले. दलित संघटनांनी राज्यभर आंदोलनं, निदर्शनं सुरू आहे. मात्र दुसरीकडे सरकारचं स्थापन नसल्यामुळे निर्णय कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झाला. 11 दिवस उलटूनही आरोपी सापडतं नसल्यामुळे दलित संघटनांनी आक्रमक होतं आणखी आंदोलनं तीव्र केलीये. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जवखेडेला भेट देऊन पीडित कुटुंबीयांचं सात्वन केलं. काल गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर शानदार शपथविधी सोहळ्यानंतर फडणवीस सरकारने कामाला सुरुवात केलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळी दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना, पाथर्डी हत्याकांड प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे उपमहासंचालकांना आदेश देण्यात आले आहे, उद्या पंकजा मुंडे जवखेडेला भेट देतील अशी माहिती फडणवीस यांनी दिली. तर ज्यावेळेस आरोपी पकडले जातील तेव्हा या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल, अशी घोषणा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्याचबरोबर पीडित कुटुंबाला आर्थिक मदत आणि पोलीस संरक्षण देण्याविषयी निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close