शाब्बास रे पठ्‌ठ्या, गरिबीवर मात करून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी

November 1, 2014 9:02 PM0 commentsViews:

01 नोव्हेंबर : घरी अठरा विश्व दारिद्र्य…भोवताली दारूच्या भट्‌ट्या आणि असुविधेची बजबजपुरी…अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन नाशिकच्या स्वप्नील चिकणे यशाचा ‘खो’ लगावला आहे. राष्ट्रीय खो खो स्पर्धेत स्वप्निलला कुमार गटातला वीर अभिमन्यू पुरस्कार मिळालाय.

नाशिक जिल्ह्यातील पंचवटी इथं राहणार स्वप्नील चिकणेनं खोखोच्या कुमार गटातला सर्वोच्च पुरस्कार पटकावलाय. राजस्थानात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत स्वप्निलला कुमार गटातला वीर अभिमन्यू पुरस्कार मिळालाय. पंचवटीतल्या संजय नगरमध्ये स्वप्नील आजीकडे वाढला. मजुरी करणारी आजी आणि हॉटेलमध्ये काम करणारे आईवडील. पण स्वप्नीलनं या परिस्थितीवर मात केली ती खो खो वरच्या प्रेमापोटी. आणि स्वप्नीलला आशा आहे हा खेळच त्याला या गरिबीतून बाहेर काढेल. त्याच जिद्दीवर आणि चिकाटीवर स्वप्नीलनं ही मजल गाठलीये. 6 वी पासून खो खो खेळणार्‍या स्वप्नीलला साथ लाभली ती श्रीराम विद्यालयातल्या त्याच्या प्रशिक्षकांची आणि खो खो संघटनेची. त्याबळावर त्याने हे देदिप्यमान यश संपादीत केलं. त्याच्या पुढच्या वाटचालीला आयबीएन लोकमतच्या शुभेच्छा…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close