डी. शिवानंदन मुंबईचे नवे पोलीस कमिशनर

June 13, 2009 4:09 PM0 commentsViews: 2

13 जूनमुंबई पोलीस कमिशनर पदी डी. शिवानंदन यांची निवड करण्यात आली आहे. हसन गफुर यांची पोलीस कमिशनर या पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यामुळे डी. शिवानंदन यांचं नाव चर्चेत होतं. डी. शिवानंदन हे सध्या राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत आहेत. हसन गफुर यांची पोलीस गृहनिर्माण विभागाचे डीजी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे के. एल. प्रसाद यांच्याकडे कमिशनर पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

close