जमीन गैरव्यवहाराबद्दल प्रश्न विचारताच रॉबर्ट वडरा पत्रकारावर भडकले

November 2, 2014 3:03 PM0 commentsViews:

robertvadhera --621x414
2 नोव्हेंबर : सोनिया गांधींचे जावई असलेले रॉबर्ट वडरा काल (शनिवारी) पत्रकारांवर भडकले. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात एका न्यूज एजन्सीच्या पत्रकाराने त्यांना जमिनीच्या व्यवहाराबाबत प्रश्न विचारल्यानंतर वडरा यांना राग अनावर झाला आणि त्यानंतर त्यांनी पत्रकाराच्या हातातून माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्नही केला. जमीन गैरव्यवहाराबाबत विचारले असता, वडारा यांनी रागाने, ‘आर यू सिरीयस?’ असे म्हणत पत्रकाराच्या कॅमेर्‍याला धक्का दिला आणि पत्रकारावर तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबावही टाकला. त्यानंतर वडरा यांनी त्या पत्रकाराला कॅमेरा बंद करायला सांगत त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नसल्याचे सांगितले.

दरम्यान, वडरा यांनी या प्रकरणाचे स्पष्टीकरण देताना, तो पत्रकार ANI या वृत्तसंस्थेचा असल्याचं आपल्याला माहीत नव्हतं असं म्हटलं आहे. तो खाजगी फोटोग्राफर असावा, असं आपल्याला वाटल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, तो कार्यक्रम खाजगी होता. तिथे पत्रकारांना बोलवण्यात आलेलंच नव्हतं, असंही म्हंटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close