भाजपशी युती करण्याची मला घाई नाही – उद्धव ठाकरे

November 2, 2014 4:52 PM1 commentViews:

uddhav thackray

02  नोव्हेंबर : भाजपसोबत युती करण्याची शिवसेनेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट होईल असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सत्तेचं गणित मांडणार नसून, भाजपबाबतचा निर्णय कालांतराने कळेल, मला निर्णय घेण्याची घाई नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. टोलविरोधी आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरमधून झाल्याने राज्यातील नवीन सरकारने कोल्हापूरला टोलमुक्त करावे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. केंद्र सरकारने बेळगावचे बेळगावी असे नामकरण करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. यावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. त्याच बरोबर बेळगावला केंद्रशासीत प्रदेश म्हणून जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • RAVINDRA RATHOD

    KEEP-IT-UP UDHAV SAHEB THAKARE,JAR KA UDHAV SAHEBANI CHIEF MINISTER CHE PAD MAGITALE ASTE TARI TYANA MILALE ASTE..KARAN BJP CHE SARKAR ALPAMATAT AAHE.BJP LA SHIVSENESHIVAY PARYAY NAVHATA,INDEPANDAND NA GHEVUN SUDHA TYANCHE SARKAR BANAT NAVHATE,BJP KHUP PRAYATNA KELE INDEPEDANDT GHEVUN SARKAR BANVAYACHE AANI SHIVSENELA SHAH DEYACHEH HOTE PARANTU TE TYANA JAMALE NAAHI,TASECH TE RASHRTAVADILA GHEVUN SWATACHYA PAYAVAR DAGAD MARUN GHENE SHAKYA NAVHAVATE.BJP CHE NASHEEB CHANGALE AAHE SHIVSENA AJUN PARYANT GUPPA AAHE.-JAI HIND JAI MAHARASTRA.ONCE MORE AGAIN SHIVESENA KEEP-IT UP.

close