26/11 च्या आरोपींना शिक्षा होणार – रेहमान मलिक

June 13, 2009 4:10 PM0 commentsViews: 1

13 जून, इस्लामाबाद पाकिस्तानचे आंतरिक सुरक्षामंत्री रेहमान मलिक यांनी मुंबई 26/11च्या दहशतवादी हल्याप्रकरणी आरोपींना शिक्षा होईल असं म्हटलं आहे. त्यांनी भारतीय राजदूत शरत सबरवाल यांना तसं आश्वासन दिलं आहे. भारतीय राजदूत शरत सबरवाल यांनी अब्दुल रेहमान मलिक यांची भेट घेतली होती. त्यावेळी मलिक यांनी मुंबई हल्याप्रकरणी पाकिस्तान करत असलेल्या चौकशीच्या प्रगतीची माहितीही शरत सबरवाल यांना दिली. 26/11 हल्यात 180 पेक्षा जास्त लोकं मारले गेले होते तर 300 हून जास्त लोक जखमी झाले होते. जखमी आणि मारले गेलेल्यांमध्ये काही विदेशी नागरिकांचाही समावेश होता. या भीषण हल्याच्या कटामागचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि जमात-उद-दवाचा प्रमुख मोहम्मद सईदकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्या चौकशी आणि हद्दपारीचे आदेश पाकिस्तानचं कोर्ट काढणार असल्याचं शरत सबरवाल आणि रहेमान मलिक यांच्या बैठकीत ठरलं असल्याचं समजतं. जमात-उद-दवा ही संघटना लष्कर-ए-तोयबासाठी काम करत असल्याचं उघड झाल्यावर युएन सिक्युरिटी काऊन्सिलने जमातवर बंदी जाहीर केली होती. त्यानंतर 11 डिसेंबरला मोहम्मद सईदला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. मलिक आणि सबरवाल यांच्यातली चर्चा ही भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या ब्रिक या रशिया समिटच्या तीन दिवस आधीच संपली आहे.

close