पाथर्डी हत्याकांड प्रकरणी राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

November 2, 2014 7:05 PM1 commentViews:

raj thakra

02  नोव्हेंबर : जवखेडा दलित हत्याकांड प्रकरणाचा लवकरात लवकर तपास व्हावा अशी मागणी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जवखेडा हत्याकांडाचे तपास करणार्‍या पोलिसांनी मनोबळ वाढवा अशी विनंतीही यावेळी राज ठाकरेंनी फडणवीस यांच्याकडे केली.
पाथर्डीतील जवखेडा येथे दलित कुटुंबातील तिघा जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. 12 दिवसांचा कालावधी लोटूनही याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यश आलेले नाही. यापार्श्वभूमीवर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवारी) दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ‘अशा प्रकरणांमध्ये आपल्यावरच कारवाई होण्याची भिती असल्याने पोलिस चालढकल करतात. त्यामुळे पोलिसांचे मनोबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करा अशी सूचना त्यांनी फडणवीस यांना केली. या तिहेरी हत्याकांडातील आरोपींचा तपास करुन आरोपींना तातडीने शिक्षा होणे गरजेचे असून त्यामुळे पुन्हा अशी कृती करण्याची हिंमत कोणी करणार नाही असे ही ते म्हणले आहेत.
त्याच बरोबर, ऊसाला पहिला हप्ता 2,500 रुपये द्यावा आणि अंतिम दर 3,000 रुपये द्या अशी मागणीही राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मनसेच्या ब्लु प्रिंटमध्ये असणारा पर्यटन क्षेत्राचा विकास कार्यक्रम भाजपा सरकारनेही राबवावा असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले. नाशिक महानगरपालिकेत आयुक्त नसल्याने अनेक काम रखडल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिले. दरम्यान, शनिवारी राज ठाकरे यांनी जवखेडा येथील पीडित जाधव कुटुंबियांचीही भेट घेतली होती.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • MALAJI DUDHALWAD

    DHESHATIL SAMANYA JANTEVAR ANNYAY KARNARYANA TETHIL RAJYAKRTECH PAGRUN GHALATAT

close