राज्याचा मुख्यमंत्री बहुजन समाजाचा हवा होता – खडसे

November 2, 2014 8:25 PM2 commentsViews:

Eknath khadse11

2 नोव्हेंबर :  राज्यात भाजपची सत्ता आली याचा आनंद आहे. पण, राज्याचे मुख्यमंत्री बहुजन समाजाचे असायला हवे होते असे विधान महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करणारे एकनाथ खडसे यांची नाराजी अद्याप दूर झालेली दिसत नाही.

महसूल मंत्री एकनाथ खडसे रविवारी पंढरपूरमध्ये आले होते. विठ्ठलाची शासकीय महापूजा करण हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. ही पुजा करायला मिळावी अस मला मनोमन वाटत होतं आणि ती संधी मला महाराष्ट्रातील जनतेने दिल्याबद्दल मी त्यांचा जनतेचा ऋणी असल्याचं सांगत खडसे यांनी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने अजूनही नाराज असल्याचे दाखवून दिले. ‘राज्यात भाजपाला सत्ता मिळाली याचा आनंदच आहे. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजन असावा अशी राज्याच्या जनतेची इच्छा होती’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. बहुजन म्हणजे ओबीसी, वंजारी किंवा इतर समाजातील व्यक्तीही चालली असता असेही खडसे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून काय प्रयत्न केले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    काय हे … नाथा भाऊ !, दिवाळी झाली आता फटाके फोडू नका … तसा म्हणाल तर तुमचा लवंगी फटका असतो, वाजला काय अथवा नाही वाजला काय तुमच्याकडे भाजपा मधले कोणी लक्ष देत नाही, दुर्दैव आहे तुमचे दुसरे काय ?

  • Adv Nachiket

    मनोहर जोशींचं सरकार असताना राणेंनी देखील अशीच कुरबुर केली होती अणि तात्पुरतं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं होतं. आज त्यांची अवस्था काय झालीये बघताय ना!
    नाथाभाऊ…आता तरी जातीचं राजकारण सोडा आणि विकासाची, समृद्धीची कास धरा.
    पक्षनेते त्यांच्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगतात की आपल्याला दिलेलं काम करा पक्ष नक्कीच दखल घेइल. मग नेत्यांना वेगळा नियम लागू होतो का?

close