पाकिस्तानमध्ये वाघा बॉर्डरजवळ बाँबस्फोट, 48 ठार

November 2, 2014 8:43 PM1 commentViews:

B1cfBqyCYAAA523ËËË

02  नोव्हेंबर :  वाघा बॉर्डरजवळ पाकिस्तानच्या हद्दीमध्ये रविवारी संध्याकाळी 6.35 मिनिटांनी बाँबस्फोट झाला असून या बाँबस्फोटामध्ये सुमारे 48 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर 70 हून अधिक जण जखमी झाल्याचे समजते. आत्मघाती दहशतवाद्याने हा बाँबस्फोट घडवल्याचे पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले असून अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

भारत आणि पाकिस्तान सैन्याच्या ध्वज बैठकीचा कार्यक्रम बघण्यासाठी दोन्ही देशांमधील नागरिक दररोज संध्याकाळी वाघा बॉर्डरजवळ जमतात. रविवारी संध्याकाळी हा कार्यक्रम संपल्यावर पाकिस्तान हद्दीच्या पार्किंगमध्ये बाँबस्फोट घडवण्यात आला. या स्फोटात पाक रेंजर्सचे जवान, सामान्य नागरिक जखमी झाल्याचे समजते. सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत महत्त्वाचा असून सुरक्षेचे कडे भेदून दहशतवादी पार्किंगपर्यंत कसे पोहोचले असा सवालही आता उपस्थित होत आहे. दरम्यान, या घटनेबद्दलचा अहवाल देण्यात यावा, असं पंतप्रधान नवाझ शिरफ यांनी म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    बोये पेड़ बबूल का तो आम कहॉं से होय !! जेमृत्यु पावलेत त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती प्रधान करो ! पण जे पेराल तेच उगवणार…. पाकिस्तान वाले आपल्याच लोकांना मारायला उतावळे झाले आहेत यापेक्षा पाकिस्तानी लोकांचे दूसरे दुर्दैव ते काय ?

close