बलात्कार प्रकरणी अभिनेता शायनी आहुजाला अटक

June 15, 2009 9:31 AM0 commentsViews: 1

15 जून मोलकरणीवर बलात्कार केल्याची कबुली शायनी अहुजाने दिली आहे. रविवारी बॉलिवूड अभिनेता शायनी अहुजाला बलात्कारप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच 506, 339 अंतर्गतही शायनीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शायनीच्या मोलकरणीने ओशिवारा पोलिसांकडे बलात्कारची तक्रार दाखल केली होती. तिला मेडिकल टेस्टüसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान शायनीने तिच्याशी शारीरिक संबंध होते हे कबूल केलं आहे. 'गँगस्टर ', 'भुलभुलैय्या', 'खोया खोया चाँद ', 'मेट्रो' या सिनेमांमधून शायनीने कामं केली आहेत. शायनीने निरनिराळ्या इंग्रजी नाटकांतूनही कामं केली आहेत.

close