राज ठाकरेंच्या मुलीच्या भेटीला उद्धव ठाकरे

November 3, 2014 9:24 AM0 commentsViews:

RAJ UDDHAV MEETS

03  नोव्हेंबर :मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलगी उर्वशी हिचा काल (रविवारी) दुचाकीवरुन अपघात झाला होता. अपघातानंतर तिला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहेत. काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी स्वत: हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाऊन उर्वशीची विचारपूस केली. उद्धव ठाकरे जवळपास अर्धा तास हॉस्पिटलमध्ये थांबले होते. यावेळी राज ठाकरेही त्यांच्यासोबत तिथे उपस्थित होते.

संध्याकाळच्या सुमारास उर्वशी तिच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरुन जात असताना अपघात झाला. या अघातात तिच्या पाय फ्रॅक्चर झाल्याचं कळतं आहे. या घटनेनंतर राज ठाकरे यांनी आपले पुढच्या दोन दिवसांचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close