अकरावीच्या प्रवेशाचा 90:10 कोटा बारगळण्याची शक्यता

June 15, 2009 9:34 AM0 commentsViews: 1

15 जून अकरावी प्रवेशासाठी 90 टक्के कोटा लावायचा की नाही याबाबतची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. 90-10 कोटा निर्णय जवळपास रद्द होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे एसएससीच्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कोटा फॉर्म्युला रद्द झाला तर समानीकरणासाठी सरकार आयत्या वेळी कोणता फॉर्म्युला लावणार, असा प्रश्न यंदा दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे. अकरावी प्रवेशाच्या 90:10 कोटा फॉर्म्युलाची शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अधिकृत घोषणा करणार आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 90 टक्के कोटा देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. उरलेल्या 10 टक्के जागा केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातील. याविरोधात आयसीएसई बोर्डाच्या माहीम इथल्या बॉम्बे स्कॉटिश हायस्कूलमध्ये शनिवारी सह्यांचं आंदोलन करण्यात आलं होतं. मुंबईतील आयसीएसई बोर्डाच्या अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी सह्यांद्वारे कोटा फॉर्म्युल्याला निषेध दर्शवला आहे.

close