अर्थखात्याबाबत सरकार श्वेतपत्रिका काढण्याच्या विचारात

November 3, 2014 2:07 PM0 commentsViews:

mungantiwar

03  नोव्हेंबर : राज्याच्या अर्थखात्याची श्वेतपत्रिका काढण्यावर विचार सुरू असल्याचं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. आघाडी सरकारच्या काळात अर्थखात्यात झालेल्या अनागोंदी चव्हाट्यावर आणणार सल्याचं मुनगंटीवार म्हणालेत. ते नागपूर मध्ये बोलत होते.

राज्यावर असलेले कोट्यवधींचे कर्ज पाहता, कर्जाचे पैसे नेमके गेले कुठे यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा विचार केला जात असल्याचे ते म्हणाले. तसेच यात दोषी कुणीही असो, श्वेतपत्रिका काढल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत. शिवाय जनतेच्या कामासाठी दिलेल्या निधीचा योग्य उपयोग झाला नाही, असा आरोप देखील मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात अर्थखाते सांभाळणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close