मुख्यमंत्र्यांचा प्रवाशांसोबत सेल्फी

November 3, 2014 3:15 PM0 commentsViews:

03  नोव्हेंबर : नागपूरला जाताना मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या साधेपणाचे दर्शन घडवलं. देवेंद्र फडणवीसांनी मुंबई ते नागपूर स्वखर्चाने विमान आणि व्हीआयपींसाठी राखीव असलेल्या जागांवर प्रवास न करता इकॉनॉमी क्लासने प्रवास केला. यावेळी विमानातल्या सहप्रवाशांनी त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची हौस भागवून घेतली. स्वत: मुख्यमंत्र्यांनीही सेल्फी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर मोहीम सुरू केली आहे. त्यालाच प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला आहे

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close