भारताचं टी-20 वर्ल्डकपमधील आव्हान संपलं

June 15, 2009 9:42 AM0 commentsViews: 8

15 जून वर्ल्ड चॅम्प भारताचं टी-20 वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. यजमान इंग्लंडने भारताचा 3 रन्सने पराभव केला आहे. रविवारच्या सुपर-8 गटातल्या भारत विरूद्ध इंग्लंड मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या इंग्लंडच्या साईड बॉटमनं भारताला वर्ल्ड कपमधून साईड लाईन केलं आहे. रविवारी भारत विरूद्ध इंग्लंडच्या मॅचमध्ये भारताची सुरुवात चांगली झाली होती. भारताला सर्वात महत्त्वाची अशी लूक राईटची विकेट मिळाली होती. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण त्यावेळी इंग्लंडचे दोन सर्वोत्तम बॅट्समन केविन पीटरसन आणि रवी बोपारा मैदानावर होते. त्यांनी भारतीय बॉलर्सची पिटाई केली. अखेर पीटरसन आणि बोपाराची 71 रन्सची पार्टनरशिप रविंद्र जडेजाने मोडली. काही ओव्हर्सनंतर पीटरसनची मोठी विकेटही मिळाली. त्यानंतर इंग्लंडच्या टीमवर अचानक दडपण जाणवायला लागलं होतं. हरभजन सिंगने त्याची सर्वोत्तम बॉलिंग करत 3 विकेटही घेतल्या होत्या. पण चांगल्या सुरुवातीनंतरही इंग्लंडने 7 विकेट गमावत फक्त 153 रन्स केले. रविवारच्या मॅचमध्ये भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा आणि सुरेश रैना झटपट आऊट झाले. जडेजा अडखळत खेळत असला तरी याआधीही अशाप्रकारची परिस्थिती हातळल्यामुळे गंभीर रन्समध्ये भर टाकत राहिला. फटके मारण्याच्या नादात गंभीर आऊट झाला आणि भारताची परिस्थिती आणखीनच बिघडली. पण युवराज सिंगने आल्या आल्याच सिक्सने सुरुवात केली. भारतासाठी अजूनही आशा होती. अडखळत खेळणारा जडेजा अखेर 25 रन्स करून आऊट झाला. आणि त्याच्या पाठोपाठ युवराजही पॅव्हेलियनमध्ये परतला. युसुफ पठाण आणि धोणीन प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये 19 रन्स अशी परिस्थिती होती. पण यावेळी चमत्कार झाला नाही. अखेर इंग्लंडने मॅच 3 रन्सने जिंकली. आणि टी-20 वर्ल्ड कपमधलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं.

close