दिल्लीत नव्याने निवडणुका होण्याची शक्यता

November 3, 2014 5:26 PM0 commentsViews:

DELHI_ASSEMBLY_1739449f03 नोव्हेंबर : दिल्लीत नव्याने निवडणुका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी नकार दिल्यामुळे दिल्लीत सरकार स्थापनेचा पेच निर्माण झालाय. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी तिन्ही मोठे पक्ष भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी अखेरची चाचपणी करत आहे. आज संध्याकाळी राज्यपाल आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं होतं. पण आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकासाठी सरकार बरखास्त केलं. ‘आप’ने सरकार बरखास्त केल्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू झाली. मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टाने जर कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेत असेल तर लवकर प्रक्रिया करावी आणि राष्ट्रपती राजवट हटवावी असे निर्देश दिले होते. भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकल्यामुळे भाजपला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी विचारणा करण्यात आली. मात्र आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी नजीब जंग यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी नकार दिला. बहुमतासाठी असलेल्या 36 जागांचा संख्या आमच्याकडे नसल्यामुळे सरकार स्थापन करू शकत नाही असं उपाध्यय यांनी स्पष्ट केलं. तर काँग्रेसनेही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्यास नकार दिलाय. तर आपने विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्या अशी मागणी केलीये. अखेरीस राज्यपालांनी शेवटची संधी म्हणून तिन्ही पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा केली पण त्यावर काही तोडगा निघण्याची चिन्ह नसल्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा निवडणुकाला सामोरं जाण्याची दाट शक्यता आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close