16 जूनला विधानसभेत सादर होणार प्रधान समितीचा अहवाल

June 15, 2009 2:59 PM0 commentsViews:

15 जून 26/11 च्या मुंबई हल्ल्याविषयीचा राम प्रधान समितीचा अहवाल महाराष्ट्र सरकार 16 जूनला विधानसभेत सादर करणार आहे. 16 जून हा विधीमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच टाळाटाळ करण्यासाठी सरकारने सोमवारी अहवाल सादर केला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला. या आरोपामुळे विधानसभेचं सोमवारीच्या सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. या अहवालावर चर्चा होऊ न देण्याचा सरकार कट करत असल्याचा आरोपही विरोधकांनी सभागृहात केला आहे. एखाद्याच अधिकार्‍याला टार्गेट करणं चुकीचं आहे, असं मत काही मंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. आणखी काही सुधारणा ऍक्शन टेकन रिपोर्टमध्ये असायला हावी, असंही मंत्र्यांनी सुचवलं.

close