सिंधुदुर्गात हत्तींचा धुडगूस

November 3, 2014 7:22 PM0 commentsViews:

03 नोव्हेंबर : सिंधुदुर्गात जंगली हत्तींनी उच्छाद मांडलाय. गेल्या तीन दिवसांपासून कुडाळमध्ये जंगली हत्ती घुसलेत आणि त्यांनी कुडाळमधल्या पणदूर, वेताळबांबर्डे , डीगस, आईनमळा या भागात माड बागायत आणि भातशेतीचीही मोठी नासधूस केलीय. त्यामुळे शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या हत्तींनी काही ग्रामस्थांच्या घरांची लोखंडी गेटही तोडून टाकली आहेत. यामुळे या परिसरात भीतीबरोबरच संतापाचंही वातावरण पसरले आहे. ”काहीही करा, पण ताबडतोब या हत्तींचा बंदोबस्त करा” , अशी मागणी संतप्त शेतकरी करतायत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close