जालन्यात निदर्शनं

November 3, 2014 7:43 PM0 commentsViews:

03 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्ह्यातल्या जवखेडा गावात झालेल्या दलित समाजातील तिहेरी हत्याकांडातल्या आरोपींना तात्काळ पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्या,अशी मागणी आज जालन्यातल्या सर्वपक्षीय दलित संघटनाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. जवखेडा तिहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आज जालन्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय दलित संघटनांच्या वतीने निदर्शनं करून सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी निदर्शकांनी नगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावं अशीही मागणी करण्यात आली. या आंदोलनात सर्वपक्षीय दलित संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते हे विशेष.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close