या चिमण्यांचा काय दोष ?

November 3, 2014 8:10 PM1 commentViews:

save girl03 नोव्हेंबर : वंशांचा दिवा…या हट्टापोटी आजपर्यंत अनेक निष्पाप जीवांचा गळा घोटला गेला आणि जातोय. पण, ज्या चिमण्यांनी नीट डोळेही उघडले नाही अशा निष्पाप जीवांना कचरा कुंड्यात फेकून देण्याच्या लाजिरवाण्या घटना घडल्या आहेत. नंदूरबारमध्ये पॅसेंजर रेल्वेच्या बोगीच्या टॉयलेटमध्ये एक आठ दिवसांचं स्त्री अर्भक सापडलंय. तर विक्रमगड तालुक्यातल्या शेलपाडा गावात कचरा कुंडीत आणखी एक स्त्री अर्भक सापडलंय. मन हेलावून टाकणार्‍या या घटनांमध्ये या चिमुकल्यांचा नेमका काय दोष ?

नंदूरबारमध्ये सुरत-भुसावळ पँसेंजरच्या बोगीच्या टॉयलेटमध्ये एक आठ दिवसांचे स्त्री अर्भक फेकलेल्या अवस्थेत आढळलं. नंदूरबार जिल्ह्यातल्या नवापूर रेल्वे स्टेशनवर टॉयलेटमध्ये रडण्याचा आवाज आल्यानंतर प्रवाशांना पाहणी केली असता हे अर्भक सापडलं. यानंतर रेल्वेमधल्या प्रवाशांनी गार्डला ही बाब निदर्शनाला आणून दिली, यानंतर हे स्त्री अर्भक नंदुरबार लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या स्त्री अर्भकाची प्रकृती उत्तम असून, तिची रवानगी नंदुरबारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली आहे. अतिशय सुंदर आणि निरागस असणर्‍या या आपल्या लहानगीला सोडून आईनं रेल्वेतूनच पलायन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. अशा कठोर मातेच्या आणि घरांच्याच्या कृतीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

तर मुंबईजवळील डहाणू विक्रमगड तालुक्यातील शेलपाडा या गावात एक नवजात स्त्री अर्भक सापडलंय. आज पहाटे राजेश्री ढोणे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या गोबर गॅस च्या कचरा कुंडित हे स्त्री अर्भक अज्ञात व्यक्तीने आणून ठेवल्याचं राजेश्री ढोणे यांनी सांगितलं. शेजारील महिला कचरा टाकण्यासाठी गेल्या असता त्यांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी सदर माहिती राजेश्री ढोणे यांच्या कडे दिली. राजेश्री ढोणे या महिला गावच्या पोलीस पाटील असल्याने त्यांनी तातडीने या अर्भकाला वेळीच स्वच्छ करून उपचारासाठी विक्रमगड ग्रामीण रुणालयात उपचारासाठी दाखल केलं. या अर्भकावर सध्या विक्रमगड ग्रामीण रुणालयात उपचार सुरु असून प्रकृती सुदृढ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर या प्रकरणाचा विक्रमगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या अर्भकाच्या माता पित्याचा शोध घेत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    आजून ही आपण पुरषप्रधान संस्कृतीचा ठेम्बा मिरवत आहोत आणी स्त्रियांना एक बोज समजत आहोत, जो पर्यंत स्त्रियांना बोज समजायचा विचार लोप पावत नाही तो पर्यंत हे असेच होणार आणी स्त्रियांना असे करायला काही अंशी पुरुष कारणीभूत असतात हे हि तितकेच खरे !!

close