स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची पुढची सुनावणी 10 नोव्हेंबरला

November 3, 2014 10:38 PM0 commentsViews:

 ipl spot fixing_blog03 नोव्हेंबर : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात जस्टीस मुदगल समितीने आपला अंतिम अहवाल आज (सोमवारी) सुप्रीम कोर्टात सादर केला. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

पण बीसीसीआयची वार्षिक बैठक 20 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे सुनावणी 10 नोव्हेंबरपूर्वी घ्या, अशी विनंती बीसीसीआय कोर्टाला करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.

या बैठकीच्या अध्यक्षपदी एन. श्रीनिवासनच राहतील का, याबद्दलही बीसीसीआय कोर्टाला विचारण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close