पेट्रोल-डिझेल दरांवर फेरविचार करणार – मुरली देवरा

June 15, 2009 5:17 PM0 commentsViews: 4

15 जून केंद्रीय बजेटच्या तयारीच्या निमित्ताने पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी भेट घेतली. यावेळी बोलताना येत्या बजेटनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये फेरबदल करण्याविषयी सरकार विचार करेल असं देवरा यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेले काही दिवस सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाची ही महागाई नक्कीच चिंतेची बाब असल्याचं मुरली देवरा म्हणालेत. तसंच यावेळी पेट्रोलियम मंत्रालयातर्फे काही प्रस्ताव अर्थमंत्रालयापुढे मांडण्यात आले. नॅचरल गॅसवर सात वर्षांसाठी करसवलत पुन्हा देण्यात यावी असं पेट्रोलियम मंत्रालयाने सुचवलं आहे. गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट्सना इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा दर्जा देण्यात यावा असंही या प्रस्तावात म्हटलं आहे.

close