एअर इंडियाच्या 31 हजार कर्मचार्‍यांचा पगार लांबणीवर

June 15, 2009 5:29 PM0 commentsViews: 6

15 जून एअर इंडियाच्या 31 हजार कर्मचार्‍यांना जून महिन्याचा पगार पंधरा दिवसांनी उशिरा मिळणार आहे. एअर इंडियामध्ये आर्थिक तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेअशाप्रकारे कर्मचार्‍यांना तब्बल अर्धा महिना उशिरा पगार देण्याची घटना सरकारी एअरलाईन्सच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत आहे. परिणामी 30 जूनला हाती येणारा पगार 15जुलैच्या दरम्यान कर्मचार्‍यांना मिळणार आहे. हे पाहता एअर इंडियाची आर्थिक तंगी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा फटका आता कर्मचार्‍यांना बसत आहे. 2008-2009 या वर्षात एअर इंडियाचं सुमारे सत्तेचाळीसशे कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी एअर इंडिया सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च करते.

close