चंद्रपूर जिल्ह्यात महिनाभरात दारुबंदी करणार – सुधीर मुनगंटीवार

November 4, 2014 8:57 AM0 commentsViews:

04 नोव्हेंबर :  चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यात दारुबंदी करण्याची घोषणा नवे अर्थमंत्री आणि चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्री झाल्यानंतर काल ते पहिल्यांदा चंद्रपूरला गेले. त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत असून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुनगंटीवार यांनी महिन्याभरात चंद्रपुरात दारूबंदी करणार असल्याची घोषणा केली आहे.

चंद्रपूरमीधल महिलांनी गेल्या तीन वर्षांपासून दारुबंदीसाठी लढा देत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. माजी मुख्यमंत्र्यांनीही दारुबंदीचं आश्वासन दिलं होतं. पण, ते पूर्ण केलं नाही. त्यामुळे गेल्या ऑगस्ट महिन्यात या महिलांनी चक्क मुंडन करून दारुला असलेला तीव्र निषेध व्यक्त केला होता. स्वत: मुनगंटीवार यांनी प्रचारादरम्यान, निवडून आल्यावर दारुबंदी करण्याचं आश्वासन दिलं होतं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close