सीप्लेनची यशस्वी चाचणी

November 4, 2014 2:59 PM0 commentsViews:

04 नोव्हेंबर : जुहू चौपाटी ते गंगापूर धरण या मार्गावर सीप्लेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ‘मेहेर’ या खासगी विमान कंपनी आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रयत्न सुरु आहे. सध्या जुहू चौपाटी ते लोणावळा या मार्गावर सीप्लेन सुरू झालं आहे. येत्या 7 नोव्हेंबरपासून शिर्डीला जाणार्‍या भाविकांसाठी मुंबई ते मुळा डॅम या मार्गावरही सी प्लेन सुरू होणार आहे. दरम्यान काही पर्यावरणवादी संघटनांनी यावेळी निदर्शनं केली. पण यासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या असल्याचं स्पष्टाीकरण जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागानं दिलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close