भारतात H1N1 व्हायरसच्या रुग्णांची संख्या झाली 30

June 15, 2009 5:34 PM0 commentsViews: 1

15 जून भारतात H1N1 व्हायरसच्या रुग्णांची संख्या आता 30 झाली आहे. हैदराबादमध्ये H1N1 चे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. रविवारी एकाच दिवसात 6 नवे रुग्ण आढळले. रविवारी तीन नव्या केसेसची भर पडल्यामुळे हैदराबादमधल्या रुग्णांची संख्या आता 12 झाली आहे. दिल्लीमध्ये 6 तर बंगळुरूमध्ये दोन केसेस आढळल्या आहेत. कोईमतूरमध्ये 2 तर गोव्यात 1 रुग्ण आढळला आहे. दरम्यान, जालंधरमध्ये H1N1 ची सात लहान मुलांना बाधा झाल्याचं सोमवारी आढळून आलं आहे. दलांमधली 7 लहान मुलं अमिरेकहून परतली होती. त्यांच्यात H1N1 ची लक्षणं दिसून आल्याने त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटिव्ह मिळाली आहे.दरम्यान, अमेरिकेला जाणार्‍या लोकांसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी अडव्हायझरी जारी केली आहे. अमेरिकेला जाणार्‍या लोकांनी आपलं वेळापत्रक लांबणीवर टाकावं, असं गुलाम नबी आझाद म्हटलं आहे.अमेरिकेहून आलेल्या जालंधरच्या एका विद्यार्थ्याची H1N1 टेस्ट पॉझिटिव्ह मिळाल्याने सरकारने तसं आवाहन केलं आहे.

close