अखेर दिल्लीत पुन्हा होणार निवडणुका

November 4, 2014 5:54 PM0 commentsViews:

delhi election04 नोव्हेंबर : काँग्रेस, भाजप आणि आपने सरकार स्थापन करण्यासाठी नकार दिल्यामुळे अखेरीस दिल्लीत नव्याने विधानसभा निवडणुका होणार आहे. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केली होती. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं होतं. पण अवघे 49 दिवस चाललं आप सरकार बरखास्त झालं. आपने सरकार बरखास्त केल्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर नायब राज्यपाल नजीब जंग यांनी पुन्हा एकदा तिन्ही पक्षांना सरकार स्थापनेबद्दल विचारणा केली.विशेष म्हणजे भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकल्यामुळे भाजपला सर्वात पहिले सरकार स्थापन करण्यासाठी विचारणा करण्यात आली. मात्र भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी नकार दिला. बहुमतासाठी असलेल्या 36 जागांचा संख्या आमच्याकडे नसल्यामुळे सरकार स्थापन करू शकत नाही असं दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्यय यांनी स्पष्ट केलं. तर काँग्रेसनेही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्यास नकार दिलाय. तर आपने विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्या अशी मागणी केलीये. अखेरीस राज्यपालांनी शेवटची संधी म्हणून तिन्ही पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा केली पण त्यावर काही तोडगा निघाला नाही. अखेरीस राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. केंद्र सरकारनेही मंजुरी दिल्यानंतर आता नव्या निवडणुका होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close