‘महाराष्ट्र देशा’त रुग्णाला असंही हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं !

November 4, 2014 11:43 PM0 commentsViews:

gadchiroli04 नोव्हेंबर : कुठे अपघात घडला अथवा घरात कुणी सदस्य गंभीर आजारी असेल तर सर्वात पहिले आपण संपर्क साधतो तो ऍम्ब्युलन्ससाठी…पण जर ऍम्ब्युलन्सच नसेल आणि तुमच्या रुग्णाला दोन सायकलवर खाट टाकून तयार करण्यात आलेल्या ‘सायकल ऍम्ब्युलन्स’वर न्यावं लागलं तर ? हे ऐकून कुणालाही धक्का बसेल पण अशी विदारक परिस्थिती आहे राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात… अपुर्‍या आरोग्य सुविधेमुळे इथं रुग्णाला सायकल ऍम्ब्युलन्सवरून न्यावं लागतं असल्याची धक्कादायक बाब उजेडात आलीये.

देशातल्या 25 अतिमागास जिल्ह्यांमधला एक जिल्हा गडचिरोली…आरोग्य व्यवस्थेवर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत. मात्र अजूनही आदिवासींच्या हालअपेष्टा कमी झालेल्या नाहीत. आरोग्य केंद्राच्या इमारती बांधल्यात पण सोयी-सुविधा नाहीत. काही सुविधा असल्या तर डॉक्टर नाही. चांगले डॉक्टर असले तर ते दुर्गम भागात यायला तयार होत नाही. जिमलगट्टा या आरोग्य केंद्रात असलेली ही ऍब्युलन्स गेल्या 4 वर्षांपासून भंगारात पडलीये.तर दुसरीकडे पेशंटना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी चक्क सायकली जोडून ऍम्ब्युलन्स तयार करण्यात आली आहे. साधन सामुग्रींची कमतरता असल्यानं पेशंटला आरोग्य केंद्रापर्यंत सायकलच्या मदतीनं स्ट्रेचर तयार करून आणावं लागतंय. अशा स्थितीत आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. नक्षलवाद्यांची दडपशाही आणि व्यवस्थेची अनास्था अशा बिकट स्थितीत पिचत असलेल्या आदिवासींकडे नव्या सरकारनं लक्षं द्यावं अशी मागणी नागरिकांनी केलीय.

गडचिरोलीची आरोग्य व्यवस्था

- जिल्ह्यात 30 आरोग्य केंद्र
- 45 प्राथमिक आरोग्य केंद्र
- 15 ऍम्ब्युलन्सची तातडीची गरज
- अनेक केंद्रांवर डॉक्टरांची कमतरता

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close