मुंबईत 12 वर्षांच्या मुलीला H1N1 लागण झाल्याचा संशय

June 15, 2009 5:39 PM0 commentsViews: 7

15 जून बँकॉकहून मुंबईत परतलेल्या एका 12 वर्षांच्या मुलीला H1N1 च्या विषाणूची बाधा झाल्याचा संशय आहे. तिला तातडीने सोमवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या टेस्टचे रिपोर्टस मंगळवारी संध्याकाळपर्यंत मिळतील, अशी माहिती राज्य आरोग्य सेवेचे उपसंचालक यू. एच. गावंडे यांनी दिली आहे. यापूर्वी मुंबईत H1N1 चे 22 संशयित रुग्ण आढळले होते. परंतु, त्या सर्वांचे लॅब रिपोर्टस निगेटिव्ह आले. त्यामुळे मुंबईमध्ये आतापर्यंत एकही H1N1 चा बाधित रुग्ण आढळलेला नाही. मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात H1N1 च्या संशयित रुग्णांवरील उपचारांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. दिल्ली आणि पुणे इथल्या व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट या दोन लॅबना जागतिक आरोग्य संघटनेने H1N1 च्या तपासणीसाठी अधिकृत केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.

close