सेन्सेंक्सची विक्रमी भरारी, पहिल्यांदाच पार केला 28 हजारांचा ऐतिहासिक आकडा

November 5, 2014 11:35 AM0 commentsViews:

sensex1

04 नोव्हेंबर :  सेंसेक्सच्या निर्देशांकाने आज (बुधवारी) विक्रमी भरारी घेत पहिल्यांदाच 28 हजारांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. तर निफ्टीनेही 8.363 अंशांपर्यंत झेप घेतली आहे.

गेल्या दोन्ही आठवडयात सलग चार सत्रात तेजीत राहणारा सेन्सेक्स 28 हजाराला स्पर्श करण्याच्या अंतरापासून काहीसाच दुरावला होता. मात्र, आज (बुधवारी) मुंबई शेअर बाजार सुरू होताच 28 हजारांचा टप्पा पार करत एक नवा विक्रम नोंदवला आहे. सुमारे 141 अंकांची भरारी घेत सेन्सेक्सने आजवरची सर्वोच्च पातळी गाठली आहे. तर निफ्टीनंही 8 हजार तीनशेचा पल्ला गाठला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेली घट, गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्याने शेअर बाजारात सध्या ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत आहे. गेले काही दिवस परदेशी गुंतवणुकदार भारतीय कंपन्यांचे शेअर्स प्रचंड प्रमाणात खरेदी करतायेत. त्यामुळे शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून तेजी आली आहे. गुंतवणूकदारांनी आयसीआसीआय बँक, टीसीएस, बजाज ऑटो, टाटा ऑटो, सिप्ला आणि सन फार्मा या बड्या कंपन्यांच्या शेअर्सना प्राधान्य दिलं जात असल्याचे जाणकारांनी सांगितले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close