सी-लिंकवर तरुणाचा फिल्मी ड्रामा, आत्महत्या करण्याचा प्रयत्न

November 5, 2014 12:29 PM0 commentsViews:

sealink suicide

04 नोव्हेंबर : मुंबईतील वांद्रे- वरळी सी लिंकवर सोमवारी रात्री एक चित्त थरारक नाट्य घडलं. वांद्र्यातील हॉटेलमध्ये वेटर असलेल्या एका तरुणाने सी- लिंकवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. संपत चौधरी असे या तरुणाचे नाव असून पोलीस, फायर ब्रिगेड आणि मच्छीमारांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला वाचवण्यात यश आले.

संपत चौधरी या तरुणाने रात्री सव्वा नऊ वाजता वांद्र्याच्या बाजूने टॅक्सी केली. फोटो काढायच्या बहाण्याने त्याने टॅक्सी थांबवायला सांगितली व टॅक्सीचालकाला पैसे देऊन त्याला जायला सांगितले. यानंतर संपत सी-लिंकच्या रेलिंगला लटकायला लागला. तिथल्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना बोलावलं. पोलीस आले आणि थोड्या अंतरावरून त्याची समजूत काढायला सुरुवात केली. पण संपत काही केल्यास ऐकेना. याच वेळी, एका पोलिसाने जवळच राहणार्‌या मच्छीमारांना संपर्क केला. 11 वाजता ते आपली होडी घेऊन ब्रिजच्या खाली आले. संपतने उडी मारली तर आम्ही त्याला वाचवू शकू, असं त्यांनी पोलिसांना फोनवरून सांगितलं. हे समजताच संपतला कळू न देता, पोलीस संपतच्या जवळ पोहोचले. संपतने शेवटी खोली उडी मारण्याचा प्रयत्न केलाच, पण पोलिसांनी वेळेत त्याचे हात धरले, आणि त्याला सी-लिंकवर खेचलं. तब्बल अडीच तास हे नाट्य सुरू होते.

हॉटेल मालकाने पगार दिला नसल्याने निराश होतो असा कांगावा त्याने केला. पोलिसांनी मालकाला बोलवताच संपतने खरे कारण सांगितले. मालकाने पगार दिला होता पण सट्टयात पैसे हरलो अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी याबाबत FIR दाखल केली नसून पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये या घटनेची नोंद केली पोलिसांनी संपतला मालकाच्या ताब्यात दिले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close