नालासोपार्‍यात बिल्डर राजेश सिंग यांची गोळ्या झाडून हत्या

November 5, 2014 2:05 PM0 commentsViews:

rajesh singh

04 नोव्हेंबर :  नालासोपार्‍यात साईनाथनगर येथे राहणारा एका बिल्डरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राजेश सिंग असं मृत बिल्डरचं नाव आहे.

राजेश सिंग आपल्या ऑफिसजवळच्या असलेल्या टॉयलेटमध्ये जात असताना आज दुपारी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यानतंर राजेश सिंह यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++