शायनी अहुजाला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी

June 15, 2009 5:59 PM0 commentsViews: 1

15 जून बॉलिवूड अभिनेता शायनी अहुजाला बलात्कारप्रकरणी 18 जूनपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शायनीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्या मोलकरणीने केला होता. बलात्कार प्रकरणी शायनीला रविवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तसंच 506, 339 अंतर्गतही शायनीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. शायनीवर धमकी दिल्याचा गुन्हाही दाखल केला होता. शायनीने त्याचे मोलकरणीशी शारीरिक संबंध असल्याचं कबूल केलं आहे.

close