IBN लोकमत इम्पॅक्ट : अखेर ‘तिथे’ ऍम्ब्युलन्स दाखल

November 5, 2014 7:26 PM0 commentsViews:

gadchiroli_ambu05 नोव्हेंबर : ‘राकट देशा दणकट देशा…महाराष्ट्र देशा’ असं प्रत्येक मराठीजण अभिमानाने म्हणतो पण याचा महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात अपुर्‍या आरोग्य सुविधेमुळे रुग्णांची कशी गैरसोय होत होती ही बाब आयबीएन लोकमतने उघड केल्यानंतर आता प्रशासनाला खडबडून जाग आलीये.

धूळ खात पडलेल्या ऍम्ब्युलन्स दुरुस्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी दिले आहे. जिमलगट्टा या आरोग्य केंद्रात 4 वर्षांपासून ऍब्युलन्स गेल्या भंगारात पडल्यात. त्याची दखल जिल्हा परिषदेनं घेतली आणि ऍम्ब्युलन्स दुरुस्त करण्याचे आणि तातडीची गरज म्हणून काही ऍम्ब्युलन्स भाड्यानं घेण्याचे आदेश दिले आहेत.

ऍम्ब्युलन्स भंगारात जमा झाल्यामुळे इथल्या नागरिकांनी अक्षरश:आपल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी दोन सायकलवर खाट बांधून रुग्णांला नेले जात होते. अखेरीस झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आली असून लवकरच ऍम्ब्युलन्स रुग्णाच्या सेवेत दाखल होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close