संरक्षण मंत्रिपद नको, गोव्यातच खुश -पर्रिकर

November 5, 2014 11:32 PM0 commentsViews:

parrikar05 नोव्हेंबर : गोव्याचे मुख्यंमत्री मनोहर पर्रिकर यांना संरक्षण मंत्रिपद मिळण्याची चर्चा आज (बुधवारी) दिल्लीत सुरू झाली. पण पर्रिकरांनीच ही शक्यता फेटाळून लावलीय. आपण गोव्यातच राहणार असल्याचं पर्रिकर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या चर्चेवर तुर्तास पडदा पडलाय.

मोदी सरकारने आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाल सुरू केली. गोव्याचे मुख्यंमत्री मनोहर पर्रिकर यांची संरक्षण मंत्रिपदवर बढती मिळण्याची शक्यता वर्तवली गेली. यासाठी पर्रिकर यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले. दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्याचबरोबर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आणखीही काही मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पण सरंक्षण मंत्रालयाची जबाबदारी आपल्याकडे देण्याची शक्यता पर्रिकरांनीच फेटाळून लावलीय. आपण गोव्यातच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडेच संरक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यांच्यावरचा हा भार हलका करण्यासाठी पर्रिकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close