एमआयएम आणि अतिरेक्यांमध्ये फरक काय? -प्रणिती शिंदे

November 5, 2014 9:02 PM6 commentsViews:

praniti_shinde_on_mim05 नोव्हेंबर : एमआयएम ही संघटना आणि त्यांचे नेते देशविरोधी वक्तव्य करत असल्यानं अतिरेकी आणि एमआयएम संघटनेत फारसा फरक नाही, असं वादग्रस्त विधान सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलंय. त्या सोलापुरात बोलत होत्या.

विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्यमधून एमआयएमच्या तौफिक शेख यांनी आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना चांगलीच लढत दिली होती. त्यामुळे शिंदे कुटुंबाननं निवडणुकीनंतर एमआयएमला लक्ष्य केलंय. एमआयएम संघटना ही कोणत्या समाजाच्या विरोधात आहे याबद्दल मी बोलत नाही. पण ते देशाच्या विरोधात आहे. त्यामुळे देशविरोधी वक्तव्य करणार्‍यांना देशात जागा नसावी. मग अतिरेकी आणि त्यांच्या फरक तरी काय ? असा वादग्रस्त सवाल प्रणिती शिंदेंनी उपस्थित केला. मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा एमआयएम पक्षाने आक्षेप घेतलाय. कालपर्यंत काँग्रेसचं काम करताना आम्ही अतिरेकी नव्हतो का ? एमआयएममध्ये जाताच देशद्रोही ठरलो का, असा सवाल प्रणिती यांचे प्रतिस्पर्धी आणि एमआयएमचे उमेदवार तौफिक शेख यांनी केलाय.


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Shahezad Khan

  अब क्या लोकतंत्र मुस्लिम को वोट करने का भी अधिकार नही रहा.साढ़े पाँच लाख मतदाता ने वोट दिया है क्या वो मतदाता आतंग्वाद है

  • jan

   U didn’t get what she said, she said imi is not less than any terrorist organisation. She never said Muslims can’t vote. But as usual you will never see anything bad in Owaisi, isis, boko haram, and so on… Keep beating around bush…

 • Mahesh Deshmukh

  एमआयएम ही संघटना आणि त्यांचे नेते देशविरोधी वक्तव्य करत असल्यानं अतिरेकी आणि एमआयएम संघटनेत फरक नाही.

 • Mahesh Deshmukh

  देशविरोधी वक्तव्य करणार्‍यांना देशात जागा नसावी.

  • shaikh sayeed

   Muslim agar kuch change chahte ho to seedha party hi aatankwadi…
   seedhe seedhe kyun nhi kehte k dar gaye MIM se

 • Adv Nachiket

  तौफिक शेख यांचे म्हणणे अगदी रास्त आहे. भडकाऊ भाषणांमुळे जर निवडणुकीत जिंकता आलं असतं तर सर्वच पक्षांनी उघड उघड तशी भूमिका घेतली असती. हा कॉंग्रेसच्या नाकर्तेपणावरचा लोकांचा असलेला रोष आहे नाहीतर वर्षानुवर्षं कॉंग्रेसला मत देणारे अचानक आपली निवड का बदलतील?

close