‘प्रदेशाध्यक्षपद अशोक चव्हाणांना द्या, पृथ्वी’बाबा’ नकोच’

November 5, 2014 8:55 PM0 commentsViews:

05 नोव्हेंबर : काँग्रेसच्या पराभवाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणाच जबाबदार असल्याने त्यांना गटनेता करू नये, असा विरोधाचा सूर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावलाय. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनीच नेतृत्व केलं पण तरीही काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे काँग्रेसच्या बहुतांशी आमदारांचा चव्हाणांच्या नावाला विरोध आहे, असंही सत्तार म्हणाले. तसंच प्रदेशाध्यक्षपद म्हणून अशोक चव्हाण यांची नियुक्ती करावी. अशोक चव्हाण यांनी 2009 च्या निवडणुकीत भरीव कामगिरी केली होती. आताही लोकसभेत ते विजयी झाले आहे. नांदेडमध्ये काँग्रेसला पूर्ण यश मिळालंय त्यामुळे मराठवाड्यातून अशोक चव्हाण यांनाच प्रदेशाध्यक्ष बनवा अशी मागणीही त्यांनी केलीय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close