विधानपरिषदेत सेना-भाजपचे 3 आमदार निलंबित

June 16, 2009 11:31 AM0 commentsViews: 1

16 जून राम प्रधान समितीच्या अहवालावरून गोंधळ घातल्याप्रकरणी विधानपरिषदेच्या तीन आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. अहवाल विधानसभेत मांडावा यासाठी सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे उपसभापती वसंत डावखरे यांनी भाजपचे विनोद तावडे तर शिवसेनेचे दिवाकर रावते आणि अरविंद सावंत या तीन आमदारांना 3 वर्षांसाठी निलंबित केलं आहे. राम प्रधान समितीचा मूळ अहवाल सादर होत नसल्याने विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळात सभापती शिवाजीराव देशमुख सभागृहाचं कामकाज पुढे नेत होते. तेव्हा विनोद तावडे, दिवाकर रावते आणि अरविंद सावंत या तिघांनी पीठासीन अधिका-यांच्या आसनापर्यंत धाव घेऊन त्यांच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी सभागृहाच्या शिस्तीचा भंग होत असं उपसभापती वसंत डावखरे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या तीन आमदारांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

close