पुण्यात मोर्चा

November 5, 2014 9:41 PM0 commentsViews:

05 नोव्हेंबर : अहमदनगरमधील जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ पुण्यात सर्व दलित संघटनांनी एकत्रितरित्या मोर्चाचं आयोजन केलं होते. पुण्यातील कॅम्प भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते विधानभवनापर्यंत निघालेल्या या मोर्चात दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. महिला, तरुणांचाही या मोर्चात सहभाग होता. स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांनी जवखेडला भेट द्यावी आणि इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close