सोलापूरकरांची ‘झेप’

November 5, 2014 9:53 PM0 commentsViews:

05 नोव्हेंबर : आजपासून सोलापूरकरांना एअरक्राफ्टमधून हवाई सफरीची संधी मिळणार आहे. सोलापूर परिसरात असलेल्या तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर आणि उजनी धरण परिसराची हवाई सफर आता करता येणार आहे. कारण सोलापुरात ‘झेप’ या मेगा फ्लाईंग फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. दिवसा विमानफेरी आणि दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळी पॅराग्लायडिंग करण्याची संधी या फेस्टिव्हलद्वारे सोलापूरकरांना मिळालीये. सध्या 2 पॅरासेलर, 2 पॅराग्लायडर आणि 3 मिनी एअरक्राफ्ट यांचा समावेश आहे. दिवसाच्या पॅराग्लायडिंगसाठी एका व्यक्तीला 1700 रुपये तर नाईट पॅराग्लायडिंगसाठी 2500 रुपये असा दर आकारण्यात येतोय. तर एअरक्राफ्टच्या सफरीसाठी प्रतिमाणशी 6000 रुपये द्यावे लागतील. त्यात आजूबाजूच्या पर्यटन स्थळांची सफर घडवण्यात येईल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close