…आणि ‘रायगडा’ने घेतला मोकळा श्वास

November 5, 2014 10:09 PM1 commentViews:

05 नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याने मोकळा श्वास घेतलाय. रायगड परिसरात साचलेल्या कचर्‍याची जिल्हा प्रशासनाकडून विल्हेवाट लावण्यात आलीये. 73 गोणी कचरा काढून रायगडचा परिसर स्वच्छ करण्यात आलाय.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या परिसरात ठिकठीकाणी कचर्‍याचे ढीग साचले होते. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत जिल्हा प्रशासनाने किल्ले रायगड स्वच्छता मोहिम राबवत हा परिसर स्वच्छ केला. त्यांनी या परिसराची साफसफाई करत तब्बल 73 गोणी कचरा जमा केला. या कचर्‍यात प्लास्टिकच्या पिशव्या, मद्याच्या बाटल्यांचाही समावेश होता. या मोहिमेत जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागातले अधिकारी आणि कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक आणि पर्यटकही सहभागी झाले होते. पर्यटक येतात व कचरा करून जातात त्यामुळे स्वच्छतेचं महत्व लोकाना कळावं, या हेतूनं रायगडची निवड केल्याचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व कार्यालयांची स्वच्छता दर महिन्याच्या 7 तारखेला करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात सर्व अधिकारी तसेच कर्मचारीही सहभागी होणार आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Mahesh Deshmukh

    Great Work… Appreciable…

close