18 जूनपासून होणार इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रकियेला सुरुवात

June 16, 2009 5:09 PM0 commentsViews: 3

16 जूनगुरुवार म्हणजे 18 जूनपासून इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रकियेला सुरुवात होणार आहे. यंदापासून इंग्रजीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने होणार आहे. त्यासाठी राज्यात दहा ठिकाणी प्रवेश अर्जांची विक्री केली जाणार आहे. एका प्रवेश अर्जाचा दर सहाशे रुपये आहे. इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी विधार्थ्यांनी राज्यातल्या सहा स्वायत्त इंजिनिअरिंग कॉलेजेसना प्राधान्य दिलं आहे. कारण या कॉलेजेसमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरीसाठी लाखांची पॅकेजेस मिळतात. आयसीटी कॉलेज म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हे मुंबईतील नामवंत कॉलेज असून याची खासियत म्हणजे इथे विधार्थ्यांना अनेक स्कॉलरशिप्स मिळतात. मंदी असूनही या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लाखोंची पॅकेजेस मिळाली आहेत, असं संस्थेचे संचालक प्रा. जी. डी यादव यांनी सांगितलं आहे. व्हीजेटीआय हे मुंबईतील दुसरं महत्तवाचं कॉलेज आहे. यंदाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये व्हीजेटीआयच्या विधार्थ्यांना प्रत्येकी अठरा लाख रुपायांची वार्षिक अशी पॅकेजेस मिळाली आहेत. त्यामुळे ही दोन कॉलेजेस विद्यार्थ्यांच्या हीटलिस्टवर आहेत. मुंबईच्या आयसीटी कॉलेजमध्ये 148 जागा, व्हीजेटीआयमध्ये 462 जागा, पुण्याच्या सीओईपी मध्ये 627 जागा, व्हीजेटीआय मध्ये 504 जागा, सांगलीच्या वालचंद्र मध्ये 429 जागा, नांदेडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 495 जागा आहेत. अशा सहा कॉलेजेसमध्ये एकूण 2 हजार 665 जागा उपलब्ध आहे. इंजिनिअरिंगच्या उर्वरित जागा टेक्निकल एज्युकेशन डायरेक्टरेटतर्फे भरण्यात येणार आहे.

close