पुण्यात युवा सेनेच्या प्रमुखावर प्राणघातक हल्ला

November 5, 2014 11:51 PM0 commentsViews:

 nitn bhujbal05 नोव्हेंबर : शिवसेनेच्या युवा सेनेचे पुणे शहर प्रमुख नितीन भुजबळ यांच्यावर वडगावशेरीमध्ये 2 अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात नितीन भुजबळ यांच्या डोक्याला, हाताला मोठ्या जखमा झाल्या.

हल्लेखोरांनी नितीन भुजबळ यांची गाडी अडवली आणि हल्ला केला. ड्रायव्हरनं प्रसंगावधान दाखवत गाडी पळवली. पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर नितीन भुजबळ हे जहांगीर रूग्णालयात भरती झाले.

नितीन भुजबळ यांचा जाहिरातीचा म्हणजे होर्डिंग- फ्लेक्सचा व्यवसाय आहे. या हल्ल्यामागं राजकीय कारण की व्यवसातला वाद याचा तपास पोलीस करत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close