शौचालयासाठी मंगळसूत्र विकणार्‍या तिचा पंकजा मुंडेंच्या हस्ते सत्कार

November 6, 2014 1:31 PM0 commentsViews:

AKOLA_toilet_WEB
06 नोव्हेंबर :  सध्या देशभरात ‘स्वच्छ भारत अभियान’ योजनेचा मोठा गाजावाजा होताना दिसत आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील संगीता आव्हाळे यांनी प्रत्यक्षात एक धाडसी पाऊल उचलून इतरांना नवा आदर्श घालून दिला आहे.

सायखेडा गावात राहणार्‍या संगीता यांनी घरात शौचालय बांधण्यासाठी चक्क स्वत:चे मंगळसूत्र विकले. गावात शौचालय नसल्यामुळे संगीता यांना उघड्यावर शौचाला जावे लागत असे. त्यावेळी गाडी आली, सायकल आली की उठायचे आणि पुन्हा बसायचे असा त्रास त्यांना नेहमी सहन करावा लागत असे. यासाठी त्यांनी पतीकडे घरात शौचालय बांधून घेण्यासाठी तगादाही लावला होता. मात्र, पती आणि घरातील इतरांनी त्यांची मागणी उडवून लावली होती. अखेर या सगळ्याला कंटाळलेल्या संगीता यांनी शौचालय बांधण्यासाठी स्वत:चे मंगळसूत्र विकण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. सुरूवातीला या निर्णयामुळे संगीता यांना मोठ्या विरोध सहन करावा लागला. पण संगीता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतूक करण्यासाठी गुरूवारी मुंबईमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संगीता आव्हाळे यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, स्वत:चं सौभाग्य गहाण ठेवणार्‍या या महिलेचं सौभाग्य तू परत दे, असं आईनं सांगिल्यानं पंकजानं संगीताला मंगळसूत्रही भेट दिलं. गावागावातल्या महिलांसाठी जास्तीत जास्त शौचालयं बांधण्यात येतील, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close