अरूण जेटली यांनी दिला भाजप सरचिटणीस पदाचा राजीनामा

June 16, 2009 5:14 PM0 commentsViews: 11

16 जून नवी दिल्लीभाजप नेते अरूण जेटली यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या फॉर्म्युल्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आहे. नुकतीच अरुण जेटली यांची राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदीनिवड झाली होती.अरुण जेटली यांना महत्त्वाच्या जबाबदा-या सोपवल्याने भाजपतले अनेक ज्येष्ठ नेते हे त्यांच्यावर नाराज होते. दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे उपाध्यक्ष जसवंत सिंग यांनी पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली होती. तर सुषमा स्वराज यांनी देखील भाजपातील परिस्थीती ज्वालामुखीसारखी असल्याचं म्हटलं होतं. म्हणूनच अरुण जेटली यांनी राजीनामा दिला असावा, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर भाजपमधील मतभेद यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत.

close